अहमदनगर: गुणोरेत 27 मार्चला व्याख्यानमाला

सुपा – पारनेर तालुक्‍यातील आम्ही गुणोरेकर फाउंडेशनच्या वतीने 27 ते 29 मार्चदरम्यान गुणोरेत व्याख्यानमाला होणार आहे. यावेळी विविध पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. ही माहिती उद्योजक सचिन भालेकर यांनी दिली. फाउंडेशन आणि गुणोरे ग्रामस्थ यांच्यामार्फत मागील वर्षापासून ग्राम पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. यावर्षी हे पुरस्कार तालुका पातळीवर दिले जाणार आहेत. 29 मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित राहणार आहेत. 27 आणि 28 मार्च रोजी ग्राम व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. 27 तारखेला महिला व्याख्याते आणि 28 ला राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी अंकुश पडवळे यांचे व्याख्यान होणार आहे.

गुणोरेकर फाउंडेशनचे सचिव सचिन भालेकर म्हणाले की, आपणच करू आपल्या माणसांचा सन्मान ही संकल्पना घेऊन गुणोरे गावातून माझ्यासह विलास खोसे, देवा झिंझाड, महेंद्र बढे या तरुण सहकाऱ्यांच्या विचारधारेतून ग्रामपुरस्कार जाहीर केला. आता आम्ही याचे स्वरूप तालुका पातळीवर वाढवले आहे. हा उपक्रम आणखी व्यापक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, पारंपरिक यात्रेच्या स्वरूपाला फाटा देत विचारांची यात्रा आणि विचारांचे गाव बनविण्याचा आमचा मानस आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)