अहमदनगर: कृषि उत्पन्न बाजार समितीने दिला साडेअठरा लाखाचा धनादेश

वसुली पथकाची पाच ठिकाणी कारवाइ

नगर – महापालिकेच्या बुरूडगाव प्रभाग समिती कार्यालयाने आज (दि.28) धडाकेबाज कारवाई केली. त्यात चार पैकी एक मालमत्ता कर थकविल्याने सील केली. ही कारवाई बाजार समितीच्या भुसार आणि भाजीपाला मार्केट भागात करण्यात आली. विशेष म्हणजे, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाने थकबाकीपोटी आणि कारवाईच्या भीतीने सायंकाळी 18 लाख 67 हजार 323 रुपयांचा धनादेश दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजच्या कारवाईत, राजू बडे यांच्याकडे सुमारे एक लाख सहा हजार 870 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचा गाळा सील करण्यात आला. भुसार मार्केटयार्ड येथे रामचंद्र मेघानी यांनी एक लाख 18 हजार 139 रुपये, पेमलात कर्नावट यांनी 34 हजार 742 रुपये आणि भाजीपाला मार्केट येथील एकनाथ शिरोळे यांनी 1 लाख 36 हजार रुपयांचे धनादेश वसुली पथकाकडे दिले.

या कारवाईनंतर मनपाचे पथक बाजार समितीच्या कार्यालयाकडे गेले होते. बाजार समितीकडे एक कोटीपेक्षा थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्याबाबत बुधवारपासून चर्चा सुरू होती. शेवटी कारवाईच्या भीतीपोटी बाजार समिती प्रशासनाने आज सायंकाळी 18 लाख 67 हजार 323 रुपयांचा धनादेश दिला. प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी हा धनादेश सायंकाळी उपायुक्त कर यांच्याकडे वर्ग केला.

कर निरीक्षक शाम गोडळकर, दिलीप कोतकर, राजू सराईकर, अनिल बाबर, किसन सातपुते, अनिल आढाव, अमोल कोतकर, विजय चौरे, शिवनाथ पटवेकर व बाळू सुपेकर आदींचे पथक या कारवाईत कार्यरत होते. दरम्यान, सावेडी प्रभाग समितीचे कर निरीक्षक संजय उमाप यांनी गुलमोहोर रोडवरील अर्जुन व विष्णू बारस्कर यांच्याकडे मालमत्ता करापोटी सुमारे 46 हजार 657 रुपये थकबाकी होती. त्यांची मालमत्ता सील करण्यापुर्वीच बारस्कर यांनी थकबाकीच्या रकमेचा धनादेश दिला, अशी माहिती प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांनी दिली. येथे राजेश आनंद, बबन काळे, रफिक देशमुख, अनिल पवार, गणेश वाकळे, शेख पाशा हे वसुली पथक कारवाईत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)