अहमदनगर: कुकडीच्या अभियंत्याने शेतकऱ्याला धमकावले

कारवाईची मागणी; 2 जूनला शेतकरी करणार धरणे आंदोलन

खेड – श्रीगोंदे येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने कर्जत तालुक्‍यातील धालवडी येथील शेतकऱ्याला फोनवरून अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने निवेदन करून अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धालवडी येथील बापूराव सुपेकर यांना उपअभियंता साठे यांनी फोनवरून अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचे सुपेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेल्या निवेदनात सुपेकर यांनी घडलेला प्रकार मांडला आहे. बापूराव सुपेकर हे बुधवारी त्यांच्या शेतानजीकच्या येसवडी चारीवर आवर्तनाचे पाणी आले का हे पाहण्यासाठी गेले असता तेथे कुकडीचे कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी साठे यांना फोन केला व सुपेकर यांच्याकडे दिला. त्यावेळी “तू चारीवर का गेला? तू पुढारपण करतो, पेपरबाजी करून आम्हाला त्रास देतोस… तुला आता धडा शिकवतो.. तू नीट रहा, नाही तर तुला गाडी घेऊन येऊन पोलिसांच्या ताब्यात देतो. तू राजकारण करतो,’ असे म्हणत साठे यांनी धमकावले असल्याचे म्हटले आहे.
कार्यकारी अभियंता साठे यांनी पदाचा गैरवापर करून धमकावल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. कारवाई करावी अन्यथा कुळधरण, धालवडी भागातील शेतकरी श्रीगोंदे येथील कुकडीच्या कार्यालयात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुपेकर यांनी दिला आहे.

संघर्ष समितीकडून अधिकाऱ्याचा निषेध
धालवडी येथील शेतकऱ्याला झालेल्या धमकीचा येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे, मोहन सुपेकर, बंडू सुपेकर आदींनी पत्रक काढून निषेध केला आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना गृहीत धरू नये. अरेरावीचा प्रकार निषेधार्ह असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनीही घटनेचा निषेध केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)