अहमदनगर: कत्तलखाने प्रकरणी 8 आरोपींना अटक

कोपरगाव- शहरातील बेकायदा कत्तलखाने प्रकरणी फरार असलेल्या 8 आरोपींना शहर पोलिसांनी कोपरगाव व संगमनेर येथुन अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 29 झाली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना शहरात संजयनगर व आयेशा कॉलनी भागात अनाधिकृतपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन सुमारे 89 लाख रूपये किमतीचे 19 हजार 500 किलो गोमांस, 337 जिवंत गोवंश जनावरे व इतर साहित्य जप्त करून महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. छाप्यानंतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सदर गुन्ह्यात कोपरगावसह मुंबई व संगमनेर येथील एकुण 21 आरोपींची धरपकड करण्यात आली. शहर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत मोरे, कॉन्स्टेबल संदीप काळे, इरफान शेख, नितीन शेलार यांच्या पथकाने सोमवारी कोपरगावातुन इरफान शेरखान कुरेशी(वय33), मज्जु हुसेन कुरेशी(वय34), इरफान हसन कुरेशी(वय34), मोहसीन फरूख कुरेशी(वय24), रज्जाक इसा कुरेशी(30), शफीक शरीफ कुरेशी(वय42), अलीम सलीम शेख(वय34), सर्व रा. संजयनगर व संगमनेरातुन समीर हसन कुरेशी(45), रा. भारतनगर यांना अटक केली.

त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता या प्रकरणातील आरोपींची संख्या एकुण 29 झाली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक डॉ.सागर पाटील करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)