अहमदनगर: उन्हाच्या काहिलीचा भुरट्या चोरांना फायदा

राहुरी – सध्या उन्हाची काहिली सुरू आहे. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील जनता या त्रस्त काहीलीने घराच्याबाहेर किंवा गच्चीवर झोपतात, याचाच फायदा भुरटे चोर घेताना दिसून येतात. याचाच प्रत्यय गुरुवारी चिंचोली गावात आला चोरट्यांनी एकेक घराचा ताबा घेत रात्री 12-30 नंतर धुमाकूळ घालत पहाटे अडीच वाजेपर्यंत आपले बस्तान तेथेच ठेवले बंडू छबुशाव गागरे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून याविषयी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. राहुरीचे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट देत कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. नागरिकांनी सतर्क राहात पोलिसांना वेळीच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)