वृध्देकडून लुटला होता अडीच लाखांचा मुद्देमाल

पाथर्डी – तालुक्‍यातील शिरापूर येथून तिसगावला बॅंकेत पैसे टाकण्यासाठी रिक्षाने जात असलेल्या एका वयोवृध्द महिलेच्या डोळयात मिरची पुड टाकून सुमारे अडीच लाखचा मुद्देमाल लुटला.घटनेचे गांभिर्य पाहून गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवत अवघ्या बारा तासात आरोपींना जेरबंद करून मुद्देमाल ताब्यात घेतल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिशवित ठेवलेले दोन लाख रुपये रोख व महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण, एक मोबाईल असा सुमारे दोन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज दोन मोटारसायकलवरुन आलेल्या सहा जणांनी रिक्षा आडवून ही रस्तालूट केली आहे.
या प्रकाराबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवार दि.23 मे रोजी शिरापूर येथील कमलाबाई गहीनिणाथ मिसाळ यांनी आपल्याकडील दोन लाख रुपये नागेबाबा पतसंस्थेमध्ये टाकण्यासाठी तिसगाव येथील रिक्षाचालक समिर पठाण यास शिरापूर येथे बोलावून घेतले. त्यानंतर वयोवृध्द कमलाबाईं मिसाळ दोन लाख रुपये पिशवित घेवून समीर याच्या रिक्षात बसुन तिसगावकडे निघाल्या. शिरापूर रस्त्यावरील बुधवंत वस्तीजवळ दोन मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात सहा जणांनी मोटारसायकल रिक्षाला आडवी लावून कमलबाई मिसाळ यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्यांच्याकडील दोन लाख रुपये रोख व गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण असा सुमारे दोन लाख 31 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात दारोडे खोरांनी लुटून नेत रिक्षा चालकास मारहाण केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला घटनास्थळी तात्काळ रवाना केले. तोपर्यंत पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या पथकाने आवश्‍यक माहिती संकलित करून संयुक्त मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहिती अनुसार रिक्षा चालक समीर मुबारक पठाण, तिसगाव (घोडके वस्ती ), याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. अन्य आरोपींची नावे सांगितली. रियाज अय्युब पठाण, शफीक नाजिर शेख, चॉंद मुबारक पठाण सर्व रा.(सदर) तिसगाव यांची नावे सांगितली.
या गुन्हात अन्य आरोपींचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे,पोलीस कर्मचारी दत्ता हिंगडे, दिगंबर कारखेले, मेघराज कोल्हे, मल्लिकार्जून बनकर तर पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब खाटीक , देविदास तांदळे, नय्युम पठाण , राहुल खेडकर,भगवान सानप, निलेश म्हस्के,चंद्रकांत बऱ्हाटे, मुकुंद पोटफोडे,अतुल शेळके आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)