अहमदनगर: अर्थमंत्र्यांकडून जिल्हा विभाजनाचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या कोर्टात

संगमनेर – पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची समिती स्थापन करून त्यांनी एकमताने नव्या जिल्ह्याचे मुख्यालय ठरवावे, हे झाले तर मला त्यासाठी लागणारा निधी द्यायला अडचण येणार नसल्याचे सांगून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा मुख्यालयाचा चेंडू पुन्हा स्थानिक नेत्यांच्या कोर्टात टाकला.

तालुक्‍यातील हिवरगाव पावसा येथील जलयुक्त शिवार व विविध विकास कामांचा शुभारंभ ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला; यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, अशोक भांगरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, “” 47 वर्षांच्या सत्तेच्या काळात स्वतः कोणतेही प्रश्न न सोडवू शकणारे आमचे विरोधक हे प्रश्न आम्ही सोडवावे, अशी आशा बाळगतात याचाच अर्थ त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. या विश्वासाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्रश्न सोडविण्याची क्षमता भाजपत आहे याची त्यांना जाणीव आहे. महात्मा गांधी यांचे कॉंग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे.”

जिल्हा विभाजनासाठी माझ्यासह पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. पालकमंत्र्यांनीदेखील जिल्हा विभाजन झाले पाहिजेत, हे सांगितले. शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम कॉंग्रेसचे नेते करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निळवंडे प्रकल्पासाठी निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 47 वर्षे सत्ता भोगणारेच आज आम्हाला प्रश्न करताहेत. भाजप वगळता अन्य पक्ष केवळ परिवारासाठीच काम करत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी “गरिबोंके सन्मानमें भारतीय जनता पक्ष मैदानमें’ अशी घोषणा दिली.
ना. शिंदे म्हणाले, “”सरकार विरोधात किरकोळ मुद्यावर आरडाओरडा सुरू असून हल्लाबोल करणाऱ्यांनी यापूर्वी काय दिवे लावले असा सवाल करत निळवंडे संदर्भात 40 वर्षे त्याच तिकिटावर तोच खेळ सुरू होता. मात्र, आम्ही यासाठी निधी उपलब्ध करून दिला. निळवंडे देखील आम्ही पूर्ण करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, अर्थमंत्री यांच्याकडे मी जिल्हा विभाजनाची मागणी केली आहे. जिल्हा विभाजन मी करणारच आहे. ते केल्याशिवाय हा पठ्ठ्या थांबणार नाही. आता फक्त जिल्ह्याचे मुख्यालय कोणते करायचे यासाठी तुमच्यात किती दम आहे हे तुम्ही दाखवायचे आहे. 25 वर्षे ज्यांना हे जमले नाही ते मी करून दाखवील. माझ्याकडे कारखाना, शिक्षण संस्था, बॅंका असे गमविण्यासारखे काहीच नाही.” यावेळी राजेंद्र सांगळे, सुनीताताई कानवडे, अशोक इथापे, राजेंद्र देशमुख, सुधाकर गुंजाळ आणि स्थानिक भाजप पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)