अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

संगमनेर – खांडगाव ते निमगाव पागा जाणाऱ्या रस्त्यावर खांडेश्वर मंदिराजवळ एका मोटारसायकलला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अशोक कारभारी चव्हाण (रा. पेमगिरी) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.

तालुक्‍यातील पेमगिरी येथील रहिवासी असलेले अशोक चव्हाण हे आपल्या मोटारसायकलवरून संगमनेरहून पेमगिरीकडे खांडगाव निमगाव रस्त्याने जात असताना खांडेश्वर मंदिराजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली असता त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. चव्हाण यांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या अपघाती निधनाने पेमगिरी गावावर शोककळा पसरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)