अहमदनगरमध्ये स्कूलबस उलटून शिक्षकासह पाच विद्यार्थी जखमी

अहमदनगर: राहाता तालुक्यातील वाकडीजवळ रस्त्यालगत स्कूलबस उलटून झालेल्या अपघातात पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाली आहे. त्यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गणेशनगर येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलची बस ५० विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. वाकडीजवळ खराब रस्त्यामुळे बसचा पाटा तुटला आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यालगत उलटली. ती बस तेथील वीजेच्या खांबावर आदळून तारा तुटल्या. त्यावेळी वीजप्रवाह खंडीत झाला नसता तर, मोठा अनर्थ घडला असता, असे सांगण्यात येते. दरम्यान, या अपघातात जखमी विद्यार्थी आणि शिक्षिकेला श्रीरामपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)