अहमदनगरः कुरिअर बॉक्‍सचा स्फोट, 2 जण जखमी

अहमदनगर – कुरिअर पार्सलच्या बॉक्‍समध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना माळीवाड्यातील मारुती कुरिअरमध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. शहरातील मध्यवस्तीत पार्सलमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर अशी जखमींची नावे आहेत. संदीपच्या चेहऱ्याला दुखापत झाली, तर संजयच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्यात. दोघांवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोट झाल्याने सर्वत्र रक्ताचे डाग उडाले असून कार्यालयातील समान अस्ताव्यस्त फेकले गेले.स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक घाबरुन त्वरित घराबाहेर पडले. हे पार्सल अहमदनगरवरुन पुण्याच्या पत्त्यावर पाठवले जात होते. मात्र पाठवणाराचा पत्ता बनावट असल्याची माहिती आहे. यामुळे पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीच्या घातपाताची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. यावेळी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सीकने पाहणी केली. काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान एटीएसचं पथकही येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे पार्सल कुणी कुणाला पाठवले, याबाबतचा तपास सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)