अस्वच्छतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी दोन संपर्क क्रमांक जाहीर

पिंपरी – अस्वच्छता व आरोग्य विषयक काही तक्रार असल्यास सारथी हेल्प लाईनच्या 8888006666 क्रमांकावर किंवा आरोग्य विभागाच्या व्हॉट्‌सऍप 7745065999 क्रमांकावर अथवा संबंधीत क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह-क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागामार्फत शहरातील दैनंदिन स्वच्छता विषयक कामे केली जातात.

रस्ते, उघड्या गटर्सची साफ सफाई, घरोघरचा कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करणे, परिसरातील कचरा ढीग उचलणे, कचरा कुंड्याची स्वच्छता, खुल्या जागेत कचरा जाळणेस प्रतिबंध करणे, मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणे, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय मुतारी यांची साफ सफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, उघड्यावर मल विसर्जन करणेस प्रतिबंध करणे, खासगी सेफ्टीक टॅंक उपसणे यांचा समावेश आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्‍तीक शौचालयास अनुदान देणे, डास प्रतिबंधक उपाय योजना करणे, प्लास्टीक बंदी कारवाई इ. कामे शहर स्वच्छ ठेवणेसाठी केली जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)