अस्वच्छता पसरविणाऱ्यांना पावणेदोन लाखांचा दंड

स्टेशन परिसरात ऑगस्ट महिन्यात 725 जणांवर कारवाई

पुणे – पुणे स्टेशन परिसरात कचरा टाकणे, उघड्यावर थुंकणे, आंघोळ करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. एकट्या ऑगस्ट महिन्यात 725 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 83 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, स्टेशन परिसरात घाण करणाऱ्यांकडून शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रेल्वेने प्रत्येक स्टेशनवर घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली. या अंतर्गत स्टेशन परिसरात कचरा टाकणे, थुंकणे, आंघोळ करणे आदी प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेच्या पुणे विभागातील सर्व स्थानकांवर ही मोहीम सातत्याने राबवण्यात येत असून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 3 हजार 225 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड स्वरुपात 6 लाख 56 हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी रेल्वे प्रशासनाने स्टेशन परिसरातील आरक्षण केंद्र, प्लॅटफॉर्म येथे पोस्टर्स आणि स्टिकर्स लावले असून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातूनही वारंवार सूचना केल्या जात आहेत.

तक्रारींसाठी व्हॉट्‌स अॅप नंबर
स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. यामध्ये प्रवाशांनाही सहभागी करून घेतले जात आहे. प्रवाशांना परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास त्याचा फोटो प्रशासनाला पाठवता येणार आहे. यासाठी प्रशासनाने 9766353772 हा व्हॉट्‌स अॅप नंबर उपलब्ध करून दिला आहे. यावर प्रवाशांना तक्रार करता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)