अस्वच्छता करणाऱ्या 289 जणांवर कारवाई

पहिल्याच दिवशी 52 हजारांचा दंड वसूल

पुणे – महापालिका हद्दीत सार्वजनिक रस्ते तसेच ठिकाणांवर अस्वच्छता करणारे तसेच कचरा टाकणाऱ्यांवर सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत दिवसभरात 289 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय, रस्त्यावर लघुशंका करणाऱ्या एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

-Ads-

रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात महापालिकेने दिवाळीनंतर मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत आतापर्यंत 1,200 थुंकीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यानंतर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांच्या संख्येत घट होत असतानच पालिकेने आता आपला मोर्चा अस्वच्छता करणाऱ्यांकडे वळविला आहे. सोमवारी दिवसभरात भाजी मंडई, व्यावसायिक ठिकाणे, कचरा अधिक करणाऱ्या जागा, गर्दीची ठिकाणे, बसस्थानके अशा ठिकाणी व संबंधित कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वतंत्र पथकांची नेमणूक करून ही कारवाई केली. त्यात सर्वाधिक 47 जणांवर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कारवाई करण्यात आली. तर, वारजे-कर्वेनगर, शिवाजीनगर- घोले रस्ता, येरवडा-कळस-धानोरी रस्ता क्षेत्रीय कार्यालयांनीही 20 पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

थुंकीबहाद्दरांवरही कारवाई
महापालिकेने सोमवारी दिवसभरात 87 थुंकी बहाद्दरांवही कारवाई केली आहे. त्यामुळे या कारवाईचा आकडा 1,200 च्यावर गेला आहे. तर, यातून सुमारे 2 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मात्र, आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)