अस्वच्छता करणाऱ्या पुणेकरांनी भरला 7 लाख दंड

विशेष मोहीमेत आतापर्यंत 4 हजार जणांवर कारवाई

पुणे – शहरात रस्त्यावर थुंकणे तसेच अस्वच्छता करणाऱ्यांची संख्या 4 हजारांवर गेली आहे. महापालिकेने गेल्या दहा दिवसांत या नागरिकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत सुमारे 7 लाख 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

-Ads-

महापालिकेकडून शहरातील अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यात प्रमुख्याने रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे, तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत महापालिकेने केलेल्या कारवाईचा आकडा 4 हजार 5 झाला आहे. त्यात सर्वाधिक कारवाई शहरात स्वच्छता करणाऱ्या 2 हजार 4 जणांवर करण्यात आली आहे. तर रस्त्यांवर थुंकणाऱ्या 1 हजार 899 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या 83 जणांवर तर उघड्यावर शौचास जाणाऱ्या 7 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. महापालिकेने सुरू केलेली ही कारवाई दिवसा आणि महापालिकेच्या हद्दी जवळील भागांत रात्रीही करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाईला वेग आला असून नागरिकांमध्ये शिस्तही वाढत असल्याने महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)