अस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाई दुसऱ्याच दिवशी ठप्प

15 पथके असूनही कारवाई नाममात्रच

पुणे – गाजावाजा करत शहरात रस्त्यांवर थुंकणाऱ्या तसेच कोठेही कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने सुरू केलेली दंडात्मक कारवाई आठवडाभरातच थंडावली आहे.

शहरात प्रत्येक पदपथ आणि रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी रोज कचऱ्याचे ढीग लागत असतानाच, महापालिकेचे हे कारवाईचे आकडे कमी होत असल्यचे चित्र आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या मंगळवारी अवघ्या 47, तर अस्वच्छता करणाऱ्या 196 जणांवर कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. या उलट सोमवारी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर पहिल्याच दिवशी सुमारे 289 जणांवर कारवाई करण्यात आलेली होती. त्यामुळे महापालिकेची कारवाई मंदावत असल्याचे चित्र आहे.

या कारवाईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 15 पथके स्थापन केलेली असून त्यांच्यामार्फत प्रमुख चौक, वर्दळीच्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात दरदिवशी सुमारे 150 ते 200 जणांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, ही कारवाई दुसऱ्याच दिवशी ढेपाळली असल्याचे चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)