अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. जयंत नारळीकर, राजीव सातव, मनोज जोशी यांना पुरस्कार

पुणे – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फौंडेशन, व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे दिला जाणारा यंदाचा भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार भारतीय खगोल शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर, व्यवस्थापन शिक्षक व सल्लागार रमा बिजापूरकर, खासदार राजीव सातव, भारतीय शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध ख्याल गायक पंडित राजन मिश्रा आणि पंडित साजन मिश्रा व सुप्रसिद्ध अभिनेता मनोज जोशी यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे हे 14 वे वर्ष असून, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता पुण्यातील एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभामंडपात होणार आहे. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर व एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ कराड यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
सर्वसामान्य माणसाला खगोल शास्त्र व विज्ञान समजावे यासाठी गेल्या चार दशकाहून अधिक काळपासून खगोल भौतिक क्षेत्रात संशोधन करीत आहेत. खगोल शास्त्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतीय खगोल शास्त्रज्ञ व आयुकाचे संस्थापक व माजी संचालक पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच अन्य चार क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांनाही त्यांच्या क्षेत्रातील पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)