अस्त्र क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी

बालासोर – भारताने बुधवारी अस्त्र या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशातील चांदीपूरनजीक बंगालच्या उपसागरावर ही चाचणी झाली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ जातीच्या विमानावरून अस्त्र डागण्यात आले. त्याने अचूकपणे निर्धारित लक्ष्य असणाऱ्या बन्शी या मानवरहित हवाई यानाला भेदले.

हवेतून हवेतील लक्ष्यावर मारा करू शकणारे अस्त्र विकसित करण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हवाई दल, हिंदुस्थान एअरोनॉटिक्‍स लि.(एचएएल) यांच्याबरोबर 50 हूून अधिक सरकारी आणि खासगी उद्योगांनी योगदान दिले आहे. हवाई दलात दाखल करण्यापूर्वीची चाचणी म्हणून ताज्या घडामोडीकडे पाहिले जात आहे. अस्त्रच्या आतापर्यंत 20 हून अधिक विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)