अस्तित्वात नसलेल्या गावासाठी सेनेच्या खासदाराकडून निधी खर्च

औरंगाबाद : एखाद्या खासदाराने त्याचा निधी एखाद्या गावाच्या विकासासाठी खर्च केल्याचे आपण सगळ्यांनी ऐकले असेल पण आता शिवसनेनेच्या एका खासदारांने नसलेल्या गावावर आपला संपूर्ण निधी खर्च केल्याची धक्‍कादायक माहिती समोर येत आहे. औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही गोष्ट करुन दाखवली आहे. अस्तित्वातच नसलेल्या गावासाठी त्यांनी खासदार निधी खर्च केला असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने या घटनेचा शोध घेवून ही माहिती समोर आणली आहे. देभेगावात जिथे खासदार खैरे यांच्या खासदार निधीतून 2015-16 साली तीन लाख रुपयांची 9 कामे झाली आहेत. ज्याची किंमत आहे 27 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर आलापूर या विस्थापित झालेल्या गावातही हा निधी खर्च करण्यात आला असल्याचे वृत्तवाहिनीकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)