असे पडताळा ‘फेक फोटो’

व्हॉट्‌सअॅप, फेसबुक सारख्या समाजमाध्यमांचा वापर करत असताना अनेक वेळा आपण खोट्या माहितीचे शिकार होत असतो. मध्यंतरी अशाच माध्यमांमधून पसरवण्यात आलेल्या खोट्या माहितीमुळे अनेक निरपराध्यांना आपला जीव गमवावा लागला होता. समाजमाध्यमांवर ‘फेक न्यूज’चे पेव फुटले असल्याने आपणास जर या माध्यमांचा विवेकी वापर करायचा असेल तर समाजमाध्यमांमधून आलेल्या माहितीची पडताळणी करणे अनिवार्य झाले आहे.

सोशल मीडियामध्ये बनावट फोटोंचा वापर करून खोटी माहिती पसरवण्याचे मोठे प्रमाण आहे. अमुक ठिकाणी दंगल झाली, तमुक हॉटेलमध्ये कुत्र्याचे मास विकताना सापडले अशा आशयाचे अनेक खोटे मॅसेजेस आपल्यापर्यंत येत असतात. अशा मॅसेजेस सोबत दिलेल्या फोटोंच्या आधारे आपण ‘त्या’ घटनेची सत्यता ‘गुगल रिव्हर्स इमेजद्वारे’ पडताळू शकतो.

गुगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटोची सत्यता कशी पडताळाल?
यासाठी आपणाला सर्वप्रथम आपल्या ब्राऊजरवर गुगल ही साईट उघडावी लागेल. त्यानंतर गुगलच्या सर्च बार मध्ये ‘गुगल इमेज सर्च’ असे टाकल्यावर सर्चबार मध्ये एक ‘कॅमेऱ्याचे’ चिन्ह दिसू लागेल, त्यावर क्‍लिक करून आपण आपणाला शंका वाटत असलेला फोटो तेथे अपलोड करून त्याबाबतची माहिती मिळवू शकता. गुगलच्या या फीचरचा वापर करून आपण सदर संशयित फोटो इंटरनेटवर कुठे कुठे वापरण्यात आला आहे याची माहिती मिळवून खोट्या माहितीपासून आपला बचाव करू शकतो.

– संदीप कपडे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)