असे असेल ट्रान्झिट हब…

पुणे – पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यामध्ये क्षेत्रनिहाय विकास योजनेमध्ये ट्रान्झिट हबचा समावेश करण्यात आला होता. त्यासह व्यावसायिकांसाठी मुबलक जागा, मॉल, मल्टिप्लेक्‍स अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने, संपूर्ण जागेचा योग्य विचार करून त्यानुसार ट्रान्झिस्ट हबचा आराखडा सादर करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी कंपनीने इच्छुक आर्किटेक्‍टकडून प्रस्ताव मागविले होते, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ राजेंद्र जगताप यांनी दिली.

बालेवाडीच्या ट्रान्झिट हब नियोजित जागेसाठी विस्तृत आराखडा तयार करणे, परिसरातील विविध सेवा वाहिन्यांची माहिती संकलित करणे, महापालिका आणि इतर सरकारी विभागांच्या आवश्‍यक परवानगी प्राप्त करणे आणि नगरविकास विभागाकडून मान्यता मिळविणे अशा विविध कामांची पूर्तता संबंधित आर्किटेक्‍टने करायची आहे. महापौर मुक्‍ता टिळक यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, रविंद्र धंगेकर, स्मार्ट सिटीचे संचालक पद्मनाभन्‌ यावेळी उपस्थित होते.

-Ads-

या ठिकाणी पीएमआरडीएच्या नियोजित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे स्थानक, मुंबईहून पुण्याला येणाऱ्या अथवा लांब पल्ल्याच्या एसटी बससाठी स्थानकाची निर्मिती, शहरांतर्गत बस वाहतुकीसाठी पीएमपीचे बस स्थानक, प्रस्तावित जलद बस वाहतुकीचे (बीआरटी) स्थानक रिक्षा, खासगी प्रवासी टॅक्‍सी यासह सायकलींची उपलब्धता, व्यावसायिक वापरासाठी जागा,मल्टिप्लेक्‍स, हॉस्पिटॅलिटीकरिता जागांचा वापर शक्‍य होईल, अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)