असिफाला न्याय देण्यासाठी निषेध मोर्चा

पुणे- पुण्यातील विविध स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत असिफाला न्याय देण्याच्या मागणीसाठी एनआयबीएम येथे निषेध मोर्चा काढला. असोशिएशन ऑफ पुणे एनजीओच्या वतीने हा निषेध मोर्चा एनआयबीएम चौकात आयोजित केला होता. यावेळी सर्व संस्थांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच गुन्हेगारांना समर्थन देणाऱ्यांना देशद्रोही घोषित करावे, जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पोस्को कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

रॅलीमधील सर्व जाती-धर्मातील लोक, शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, कोंढवा, एनआयबीएम, महंमदवाडी आणि साळुंखे विहारमधील रहिवासी सहभागी झाले होते. जम्मू आणि काश्‍मीरमधील कठुआ जिल्ह्यात बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या आठ वर्षीय असिफाला सरकारने न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोंढवा मॉलपासून सुरू झालेली रॅली कौसरबागच्या मार्गे एनआयबीएमच्या मुख्य गेट येथे संपली. यावेळी राबता फाउंडेशनच्या झैद सईद, सोशल सुरक्षा फाउंडेशनचे विशाल ओव्हाळ, शोभा ट्रस्ट, बंदे खुदा ट्रस्ट आणि दार ऐ हरकम्‌चे पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)