असा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक

शब्दांकन : प्रमोद ठोंबरे

कवी मोरोपंतांचं गाव, ऊस निर्मितीत अग्रस्थानी असणारे गाव, सहकारावर पकड असणारे गाव या साऱ्या ओळखी जपत बारामती गाव कधी शहरात परावर्तीत झालं कळलंच नाही. बारामतीच्या शरद पवार या युवकाने अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि तिथूनच बारामती बरोबरच राज्याचे चित्र पालटायला सुरुवात झाली. पवार साहेबांचा केवळ राजकारणातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात वावर वाढला आणि त्यातूनच आज समोर येणारे बारामतीचे विकसित चित्र आवाक करणारे आहे. साहेबानंतर अजितदादाही राजकारणात उतरले आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणात बारामती शहराच्या विकासासाठी हातभार लावला. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील काही तरुण त्यांच्यासोबत काम करू लागले आणि विकासाला आणखी चालना मिळाली. सचिन सातव हे याच तरुणांपैकी एक नाव. सातव यांनी उद्योजक या नात्याने बारामतीकरांना अनेक सुख-सोयी दिल्याच पण आता ते राजकीय आखाड्यातदेखील उतरले असून बारामतीच्या शाश्वत विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. दैनिक प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त या लेखातून सचिन सातव यांचा तमाम तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार प्रवास आम्ही आपल्या समोर मांडत आहोत…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती, पुणे जिल्ह्यातील एक छोटेखानी शहर अशी काही वर्षांपूर्वी त्याची ओळख होती. आज सातासमुद्रा पार जरी बारामतीचं नाव जरी घेतलं तरी तिथल्या लोकांपर्यंत याची कीर्ती पोहचली आहे. यामागचं खरं श्रेय अर्थातच शरद पवार साहेबांनाच जातं, यात कोणाचंच दुमत असणार नाही. साहेबांनंतर बारामतीत अजितदादांच्या रूपाने दुसरी ळी निर्माण होऊ लागली आणि याच ळीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक युवक अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पुढे येऊ लागले. गेल्या 7-8 वर्षात बारामतीमधल्या नव युवकांनीही बारामतीच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. सचिन सातव हे यापैकीच एक अग्रस्थानी असणारे नाव. सचिन सातव यांना मोठी राजकीय पार्श्‍वभूमी लाभलेली होती. वडील सदाशिवराव, आई जयश्री व आजोबा कारभारी या तिघांनीही बारामतीचे नगराध्यक्षपद भूषवले होते. त्यामुळे घरात नेहमीच राजकीय पुढाऱ्यांची वर्दळ असायची. लहांपणीपासूनच सचिन यांच्यावर न कळत राजकारणाचा एक प्रकारचा पगडा पडत होता. पण त्यांची स्वतःची राजकारणात करिअर करण्याची कोणतीही मनस्वी इच्छा नव्हती.

मुंबई ते बारामती

7 जुलै 1979 रोजी सचिन यांचा सातव कुटुंबात जन्म झाला. शिक्षणाचे महत्त्व जाणणारे कुटुंब असल्याने मुलाला उत्तोमोत्तम शिक्षण मिळावे या उद्देशाने कुटुंबीयांनी प्राथमिक व शालेय शिक्षणासाठी सचिन यांना मुंबईला पाठविण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला ही सचिनयांच्यासाठी चांगलीच संधी होती पण पुढे त्या संधीचं सोनं करायला ते चुकले नाहीत. प्राथमिक व शालेय शिक्षणातूनच सचिन यांनी आपल्यातील कौशल्यांची चुणूक दाखवून दिली. पुढे अभियांत्रिकी क्षेत्रातच आपण काम करायचे ठरवून सचिन यांनी त्याच अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. विशेष म्हणजे त्यांना या शिक्षणासाठीही मुंबई-पुणे सारख्या शहरांचे पर्याय उपलब्ध होते पण त्यांनी मुद्दामूनच बारामतीचीच निवड केली. कदाचित त्यावेळेसच त्यांनी दूरदृष्टीचा विचार केला असावा. खरंतर इथूनच त्यांच्यातील नेतृत्व गुणांची व उद्योजकी प्रवृत्तीची झलक दिसू लागली होती. आदरणीय पवार साहेबांनी माळेगाव येथे निर्माण केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालं. आता पुढे काय करायचं असा प्रश्न होताच, पण शिक्षण घेत असतानाच भविष्यात आपण काय करायचं याची आखणी त्यांनी केलेली होती. त्यातच वडिलांची इच्छा होती की सचिन यांनी उद्योजक बनावं. त्याचदृष्टीने पाऊल टाकत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने 2001 साली सचिन नितीन आणि सुरज या सातव बंधूंनी दुचाकी वाहनांची डिअरशिप सुरु केली. आत्ताच्या ‘हिरो’ व तेव्हाच्या ‘हिरो-होंडा’ कंपनीची डिलरशिप त्यांना मिळाली. ‘महालक्ष्मी’ या नावाने बारामतीत या कंपनीचे दुचाकी विक्रीचे अधिकृत दालन सुरू झाले. तो काळ असा होता की तेव्हा प्रत्येक घरात एक दुचाकी तरी असायचीच आणि त्यातही ‘हिरो-होंडा’ कंपनीला अधिक प्राधान्य होते. त्यामुळे अल्पावधीतच ‘महालक्ष्मी डिलरशिप’ चे नाव मोठे झाली, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.

बारामतीत ‘ऑटोमोबाईल’ची क्रांती

सातव बंधू यांनी यांनी ‘हिरो-होंडा’च्या डिलरशिपमधून बारामतीच्या ‘ऑटोमोबाईल’ क्षेत्राला चालना देण्यास सुरुवात केली. त्यावेळी आजूबाजूच्या छोट्या गावातील ग्राहकही बारामतीत दुचाकी खरेदीस येऊ लागले. पण या सगळ्यात बारामतीसाठी 2006 व 2008 हे दोन वर्ष अतिशय मोलाचे ठरले. 2006 साली व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने सचिन यांनी ‘श्री. महालक्ष्मी मुव्हर्स प्रा. लि.’ ही नवी कंपनी सुरु केली. त्या काळात आदरणीय शरद पवार साहेब तसेच अजितदादा पवार यांच्या माध्यमातून’पियाजो या तीन चाकी गाड्यांची निर्मिती बारामतीत होण्यास सुरुवात झाली होती. या गाडयांना विविध ठिकाणी पोचविण्याचे काम सचिन यांनी ‘श्री. महालक्ष्मी मुव्हर्स प्रा. लि.’ या कंपनीच्या माध्यमातून केली. काम मोठं जोखमीचं होतं पण ही जबाबदारी लिलया पार पाडत सचिन यांनी आणखी एक उद्योग यशस्वी करून दाखविला.

एवढ्यावरच थांबतील तर ते सचिन सातव कसले. त्यांनी आपली उद्योगातील आगेकूच कायम चालूच ठेवली. दोन वर्षांनंतर म्हणजेच 2008 साली त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला. ‘मारुती-सुझुकी’ची तालुकास्तरावरील पहिली डिलरशिप व सर्विससेंटर सचिन यांनी बारामतीत चालू करण्याचा मान मिळवला. ‘ महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह’ नावाने बारामतीत 40 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे भव्य दालन सुरु झाले. सुरुवातीला अनेक मित्रमंडळी-नातेवाईक यांनी सचिन यांच्या या निर्णयावर असहमती दर्शविली, त्यांच्या मते तालुका स्तरावर एवढे भव्य दालन सुरू करण्याची काही आवश्‍यकता नव्हती आणि तशी मागणीही बारामतीमधून येणार नाही. पण सचिन यांनी सर्वांनच्याच विरोधात जाऊन ते दालन सुरु केले. आज या दालनाने मारुतीचे विक्री व सेवा संदर्भातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून त्यावेळी सचिन यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता हे सिद्ध करून दाखविले आहे. अर्थात आदरणीय पवार साहेब व अजित दादा पवा यांची प्रेरणा व मार्गदर्शनामुळेच हा प्रवा शक्‍य झाल्याचे सचिन यांनी सांगितले. स्वतःच्या करिअरच्या दृष्टीने बारामतीमध्ये सुरू केलेल्या या व्यवसायांनी सचिन यांची उन्नती तर झालीच पण महत्त्वाचं म्हणजे या दोन कंपन्यांमुळे बारामतीमधील ‘ऑटोमोबाईल’ क्षेत्रात क्रांती घडण्यास मदत झाली. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याने गावाकडून शहराकडे जाणाऱ्या तरुणांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. आज सातव यांच्या सर्व कंपन्यांमध्ये मिळून 450हून अधिक लोकं कार्यरत आहेत. बारामतीमधील मारुतीच्या डिलरशिपला चांगलाच प्रतिसाद मिळत होता, सातव यांच्या कंपनीच्या याच यशस्वी कामाच्या धर्तीवर ‘मारुती’ने त्यांना खूपच कमी कालावधीत ‘प्लॅटिनम डिलरशिप’ देऊन गौरविले. पुढे व्यवसायिक कौशल्य व याच यशाच्या जोरावर सचिन यांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सेनापती बापट रोड व मुंढवा तसेच मगरपट्टा परिसरातही ‘मारुती’ची डिलरशिप सुरु केली.

राजकारणातील उदय

एकीकडे सचिन यांचा व्यवसाय प्रगतीपथावर होता. तर दुसरीकडे संपूर्ण कुटुंब राजकारणात व्यस्त होतं. साधारण 2007 चा कालावधी चालू असेल, त्यावेळी सचिन त्यांचे वडील बापुजी यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्ण घेतला. काही अपरिहार्य कारणांमुळे सचिन यांना राजकारणात प्रवेश घ्यावा लागला. ते आजही बोलताना म्हणतात की, ”मला राजकीय पार्श्‍वभूमी लाभलेली असली तरी, मी अपघातानेच राजकारणात आलेलो आहे.” पण राजकारणात प्रवेश करतानाही त्यांनी थेट त्यामध्ये न पडता आधी सहकार क्षेत्राची निवड केली. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली 2007 साली ‘बारामती सहकारी बॅंके’च्या संचालक पदी सचिन यांची नेमणूक करण्यात आली, त्यावेळी ते अवघ्या 27 वर्षांचे होते. सचिन यांनी प्रवेश केल्यांनतर सहकारात काही घटना दुरुस्ती झाल्याने त्यांनी पहिलं टर्ममध्ये बॅंकेचे संचालक पद साडेसात वर्ष भूषविले. हे करत असताना आदरणीय अजितदादा पवार , चेअरमन श्रीकांत सिकची, व्यवस्थापक श्रीनिवास बहुळकर व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने बारामतीच्या सहकाराच्या दृष्टीने व बॅंकेच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत.

राज्यातील अग्रगण्य सहकारी बॅंकांपैकी एक म्हणून बारामती बॅंकेच ओळख निर्माण झाले आहे. राजकारण असो किंवा व्यवसाय असो, सचिन यांची काम करण्याची जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा अजितदादा उत्तम प्रकारे जाणून होते व त्यामुळेच गेल्या वर्षी झालेल्या बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सचिन यांना उभं करण्याचा निर्णय दादांनी घेतला. अजितदादांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरत 14 डिसेंबर 2016 रोजी सचिन सातव नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. नगर परिषदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरसेवक म्हणून जात असताना ते एकटे गेल नाहीत तर पत्नी डॉक्‍टटर सुहासिनी सचिन सातव, बंधू सुरज दत्तात्रय सातव तसेच बाळासाहेब साधु सातव कुटुंबातील या सदस्यांनादेखील त्यांनी नगर परिषदेत प्रतिनिधित्व करण्यास संधी दिली. कुटुंबातील चार सदस्य त्यांनी बहुमताने निवडून आणले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला नगरपरिषदेत निर्विवाद बहुमत मिळवून देण्यात ते अग्रेसर राहिले. जनमत आतून विजयी झालेल्या नगराध्यक्ष पोरणीमा तावरे यांना देखील प्रचंड मताधिक्‍य मिळवून देण्याची भूमिका सचिन यांनी पार पाडली.नागरपालिकेतही विविध उल्लेखनीय कार्यातून ते आपली वेगळी छाप जनमाणसांवर तसेच सामान्य जनतेवर टाकत आहेत.

राजकारण असो किंवा व्यवसाय सचिन यांनी नेहमीच उच्च व पारदर्शी कामाला प्राधान्य दिलं. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून ते देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी जाऊ शकत होते पण त्यांनी तस न करता आपल्या बारामतीच्या विकासाला अधिक प्राधान्य दिलं. मग तो विकास त्यांनी वेळप्रसंगी स्वतःच्या उद्योगांच्या माध्यमातून केला तर आता ते तो विकास राजकारणाच्या व्यासपीठावरून करू पाहत आहेत. बारामतीतील तरुणांपुढे सचिन यांनी त्यांच्या रूपाने एक चांगले उदाहरण ठेवले आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल व पुढील काळात असेच सचिन सातव बारामतीच्या विकासासाठी उभे राहतील, यात शंका नाही.

सामाजिक बांधिलकी

सातव कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत बारामती नगरपरिषदेस एक पाण्याचा टॅंकर भेट केला आहे. त्याच्या माध्यमातून बारामती नगर परिषद हद्दीमध्ये असलेल्या वृक्षांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही सातव कुटुंबीय जागृत असल्याचे दिसून येते त्यांनी नगरपरिषदेने एक रुग्णवाहिका देखील दिली आहे. स्वच्छ सुंदर बारामती साठी एक फॉगिंग मशीन तसेच कॉंक्रेट ब्रेकर दिला आहे. हरित कसबा प्रकल्प अभियानांतर्गत शहरातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे कारभारी सर्कल या चौकचे तसेच डिव्हायडरचे सुशोभीकरण देखील केले आहे त्याचे कौतुक खुद अजितदादा पवार यांनी केले आहे. सातव कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाहीत तर महिला तसेच मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या निर्भया पथकासाठी त्यांनी मारुती कंपनीची युको ही गाडी भेट दिली आहे.

”सध्याचा मतदार हा भयंकर हुशार असल्याने चुकीच्या उद्देशाने राजकारणात आल्यास लवकरच संबंधित नेत्याचा भ्रमनिरास होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आता विकास कामातूनच लोकांची मनं जिंकता येणे शक्‍य आहे. राजकारणातील मी खूप संतुष्ट व्यक्ती आहे, आदरणीय अजितदादा पवार यांनी बारामती नगर परिषदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली आहे . नगरसेवक तसेच गटनेतेपदी काम करताना मी समाधानी आहे.
– सचिन सातव, सदस्य, बारामती नगरपालिका

”कमी कष्ट आणि जास्त पैसे किंवा एका रात्रीतून करोडपती उद्योजक होण्याचे दिवस आता गेले. आता जो जिद्दीने, चिकाटीने काम करतो तोच बाजारात टिकतो. इंटरनेटमुळे आता जागतिक बाजारपेठ एका क्‍लिकवर उपलब्ध झाली आहे, त्यामुळेच व्यवसायाचे पर्यायही अनेक उपलब्ध झाले आहेत. यातूनच तरुणांनी त्यांच्या आवडीच्या व्यवसायाची निवड करून कष्टाच्या जोरावर त्यामध्ये यशस्वी झाले पाहिजे.”
– सचिन सातव, व्यवस्थापकीय संचालक, महालक्ष्मी हिरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)