असमांतर चेंबरमुळे अपघाताचा धोका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील चेंबर रस्त्याला समांतर नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, नव्याने रस्ता तयार करताना चेंबर खाली ठेऊन रस्ता तयार केला जात आहे. यामुळे, रस्त्याला समांतर चेंबर बसविण्याठी चेंबरची उंची वाढविण्याची आवश्‍यकता आहे.

शहरातील सांडपाणी वाहिनीसाठी मोठ-मोठे नाले रस्त्याखालून नेण्यात आले आहेत. या नाल्यांवरील चेंबरच्या झाकणांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. तसेच, नव्याने रस्ता तयार करताना रस्त्यामधील चेंबरची उंची न उचलता रस्ता तयार केला जात असल्याने “चेंबर खाली आणि रस्ता वर’ असे चित्र पाहावयास मिळत आहे. या स्थितीमुळे अनेक वाहने चेंबरच्या खड्ड्यात आदळत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसेच, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास चेंबरचे खड्डे दिसत नसल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच, शहरातील काही ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी झाकणेच गायब असल्याचे दिसत आहे. यामुळे, पादचारी व वाहन चालक या दोघांनाही अपघात होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील रस्त्यावर गाडी चालविणे जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. रस्त्यात कोणत्याही क्षणी अचानक खड्‌डा येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच, रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने खड्ड्यात वाहने आदळत आहेत. शहरातील बहुतांशी मुख्य रस्त्यावर वाहनांचा वेग जास्त असल्याने खड्‌डा आल्यानंतर वाहनावर नियंत्रण मिळविणे कसरतीचे ठरत आहे. चेंबरच्या खड्ड्यामुळे नागरिकांचा जीव जात आहे. यामुळे, महापालिकेने शहरातील रस्त्यामधील चेंबरची उंची वाढवून रस्त्याला समांतर करावेत, असे मत सोहम देशपांडे या तरुणाने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)