असफल लोकांबरोबर दोस्ती नाही – प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा गेल्या 1-2 वर्षांपासून बॉलिवूड ऐवजी हॉलिवूडमध्येच जास्ती एंगेज आहे. तिने 1-2 हॉलिवूडपट आणि सिरीयलही केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये ती केवळ प्रॉडक्‍शनच्याच कामासाठी बिझी असते. हॉलिवूडमध्ये स्वतःची इमेज आणखीन ठळक करण्याचा प्रयत्न सध्या पीसी करते आहे. कॅनडाच्या एका प्रतिष्ठित मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रियांकाचा फोटो आहे. या अंकामध्येच प्रियांकाची सविस्तर मुलाखतही छापलेली असणार आहे. यामध्ये तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील आपल्या प्रवासाबाबत आणि महत्वाकांक्षांबाबत सविस्तरपणे सांगितलेले असेल. तिला ऍक्‍टिंगबरोबर आणखी काय काय करायचे आहे, याचीही सविस्तर माहिती प्रियांका या मुलाखतीमध्ये सांगणार असल्याचे मासिकाच्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

या कव्हर स्टोरीमध्ये प्रियांकाने म्हटले आहे की “असफल लोकांबरोबर अजून दोस्ती झालेली नाही.’अर्थात अशा असफल लोकांपासून आपल्याला दूरच रहायचे आहे, असेच तिला म्हणायचे असावे.
या कव्हरपेजवरच्या फोटोमध्ये प्रियांका नेहमीप्रमाणे ग्लॅमरस दिसते आहे. तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर आपला एक लहानपणचा फोटोही तिने शेअर केला आहे. त्यामध्ये आपल्या मॉम आणि डॅडबरोबर छोटी प्रियांका दिसते आहे. ही लहान मुलगी भविष्यात आंतरराष्ट्रीय मासिकाची कव्हरपेजची मॉडेल बनेल असे तेंव्हा तिच्या मॉम डॅडना वाटले नसावे. हेच सांगण्यासाठी प्रियांकाने दोन्ही फोटो एकाचवेळी शेअर केले आहेत.
ब्युटी क्‍वीन, मॉडेलिंग, बॉलिवूड आणि हॉलिवूडपर्यंतचा प्रवास प्रियांकासाठी निश्‍चितच सोपा नव्हता. या सगळ्या प्रवासातील अडथळे आणि आव्हानांचा सामना आपण कसा केला, हेच प्रियांका आपल्या मुलाखतीतून सांगणार आहे.
प्रियांका सोमवारी भारतात आली. पण काही दिवसातच ती आयर्लंडला जाणार आहे. तिथे “क्‍वांटिगो 3’चे शुटिंग सुरू आहे. “क्‍वांटिगो 3′ व्यतिरिक्‍त प्रियांकाकडे सध्या तीन हॉलिवूडपट आहेत, असे समजते आहे. त्याच्याशिवाय बॉलिवूडमधील काही सिनेमांच्या स्क्रीप्टवरही ती काम करते आहे. याशिवाय आईबरोबर काही विभागीय सिनेमांचे प्रॉडक्‍शनही प्रियांका करते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)