असदुद्दीन ओवेसींचे मोदी-शहांना खुले आव्हान

हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर नेहमी टीकास्त्र सोडणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांनी मोदी आणि शहा यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. सर्वच पक्षांनी एमआयएमविरुद्ध हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवावी. मोदी आणि शहांना तर मी थेट आव्हान देतो, असे ते म्हणाले. हैदराबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

‘एमआयएमविरुद्ध हैदराबादमधून निवडणूक लढवावी, असं आव्हान मी सर्वच पक्षांना देतो. मोदी-शहा तसंच काँग्रेसलाही आव्हान देतो. इतकंच काय तर भाजप आणि  कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी, ‘एमआयएम’ला हरवण्याची त्यांच्यात ताकद नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी त्यांनी आणीबाणीविरोधात देशभरात काळा दिवस पाळणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला होता. महात्मा गांधी यांची हत्या, शिखविरोधी दंगल, बाबरी मशीद प्रकरण, २००२ मधील गुजरात दंगल या घटना जगाला हादरवणाऱ्या होत्या, हे कुणी विसरता कामा नये, असं ते म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)