असंघटीत कामगार कॉंग्रेसतर्फे गांधी जयंती साजरी

पिंपरी– असंघटीत कामगार कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर तर्फे येथील जय गणेश वरदहस्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. शहर अध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. मनोहर वाघमारे, नवनाथ डेंगळे, रमजान आत्तार, बबन शिरसाठ, शितल कोतवाल, संगिता गाडे, कौशल्या भोसले, गणेश जंजीरे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)