अष्टविनायक : शब्दरुपी मानसयात्रा

गणांचा अधिपती, बुद्धीदायक, वरदविनायक, गजानन, लंबोदर, विघ्नहर्ता परमदेव गणपती. अशा हया गजवदनाचे अधिष्ठान असलेल्या अष्टविनायकांची महती सांगणारा पहिला मोरगावचा मोरेश्‍वर, गणपत्य संप्रदायाच्या साडेतीन पीठापैकी “मोरगाव’ या यात्रेची सुरुवात मोरगावच्या मोरेश्‍वराने करावी. या ठिकाणाचे मुख्य वैशिष्टय आज घराघरात म्हटली जाणारी “सुखकर्ता दुःखहर्ता’ आरती श्री समर्थ रामदासांना या मोरेश्‍वरापुढे स्फुरली. बांधकाम दगडी असून गाभाऱ्यात श्रींची डाव्या सोंडेची मूर्ती, डोळयात, बेंबीत हिरे, मस्तकावर नाग आणि मूर्तीसमोर चक्‍क नंदीची स्थापना हे आणखी एक वैशिष्टय. या मोरेश्‍वराचे सांगता येते. कऱ्हा नदीच्या काठी वसलेले हे मोरगांव पुण्यापासून केवळ 64 कि.मी. अंतरावर आहे हा पहिला गणपती.

या विश्‍वाच्या निर्मिती कार्यात काही अडथळे आणणाऱ्या मधु व कैटभ या राक्षसांना मारण्यात विष्णूंना अपयश येत होते तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणेशस्तवन करण्यास सांगितले, तेव्हाच श्री विष्णूंनी “श्री गणेशाय नम:” या षडाक्षरी मंत्राचे उच्चारण केले. गणेशाने त्यांना सिध्दी प्रदान केली व त्यांना या राक्षसांना मारण्यात यश आले. ज्या ठिकाणी ही सिध्दी श्री विष्णूंना प्राप्त झाली त्याच ठिकाणी विष्णूंनी गंडकी शिलेची मूर्ती स्थापली. हाच सिध्दटेकचा सिध्दिविनायक दुसरा गणपती, भाद्रपद चतुर्थी व अंगारक चतुर्थी यावेळेस येथे प्रचंड गर्दी असते. श्रीं ची उजव्या सोंडेची मूर्ती उत्तराभिमुख मंदिरात विराजमान आहे, उजव्या सोंडेचे सोवळे ओवळे कडक पाळले जाते. नगर प्रदिक्षणा हे याचे वैशिष्टय, यामुळे प्रत्येक भाविक मंदिराऐवजी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालतो. भीमा नदीच्या काठावर बसलेले हे सिध्दटेक नगर-पुणे रस्त्यावर आहे.

बल्लाळेश्वर – पाली

निसर्गरम्य कोकणातील “पाली’ येथे तिसरे अष्टविनायकाचे स्थान “बल्लाळेश्‍वर’ “बल्लाळ’ नावाच्या भक्‍ताने मारलेल्या हाकेला “ओ’ देवून गजानन प्रकट झाला अशी कथा आहे, मुद्‌गल पुराणात ही कथा बघायला मिळते. पूर्वाभिमुख मंदिर यामुळे सूर्योदय वेळेस गणपती मूर्तीवर प्रकाशाचा अभिषेक होतो हे याचे वैशिष्टय. मुंबई-गोवा महामार्गावर हे ठिकाण आहे गणपती बल्लाळेश्‍वर.

कपिल मुनीकडील चिंतामणी रत्न गण नावाच्या असूराने पळवून नेले. तेव्हा त्यांनी गणपतीची आराधना केली. प्रसन्न होवून गजाननाने त्याच्याशी युध्द करुन रत्न परत मिळवून दिले. पण कपिलमुनींनी ते स्वीकारले नाही. कदंब वृक्षाखाली हे घडले तेथेच गजाननाने त्या परत मिळवलेल्या रत्नासह वास्तव केले. तेच हे “थेऊर’ पूर्वीचे करंबतीर्थ. चौथा गणपती थेऊरचा चिंतामणी पानशेतच्या पुरात या मंदिराचा कळस वाहून गेला होता. नवा कळस बसवण्यात रणजित देसाई स्वामीकार यांचे योगदान मोलाचे. मुळा-मुठा नदीच्या काळी हे मंदिर पुणे-सोलापूर मार्गावर स्थित आहे.

गौतम ऋषींनी स्थापन केलेला श्रीगणेश म्हणजे अष्टविनायकांपैकी पाचवा महडचा वरदविनायक गणपति. हयाच ठिकाणी घोर तपश्‍चर्येनंतर गृत्समदषींनी गणेशाला प्रसन्न करुन घेतले त्यांना दोन वर मागावयास सांगितले तेव्हा. श्रींचे कायम वास्तव्य व स्वतःची शुध्दी असे वर त्यांनी मागितले. गणेशाने तथास्तु असा आर्शिवाद दिला “गणानांत्वा; गणपतये” या कायम आपण उच्चारत असलेल्या वेदमंत्राचे षीत्व ही त्यांना दिले हेच याचे वैशिष्टय. शिवाय 1982 सालापासून नंदादीप अखंड तेवत आहे या मंदिरात हयाला नवस बोलल्यास पुत्रप्राप्ती होते, असे म्हणतात मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ हे मंदिर स्थित आहे.

लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक सहावा गणपती. नावातच गिरीजेचा, पार्वतीचा. पुत्र पुत्रप्राप्तीसाठी शंकराकडून मंत्र घेतला व या पर्वतावर तपश्‍चर्या केली. गणपतीने तिला वर दिला मी तुझा पुत्र होईन. भाद्रपद चतुर्थी दिवशी गजाननाची मूर्ती तयार करून तिचे पूजन केले. गजानन प्रकट झाले. त्यांचे तेज पार्वतीला सहन झाले नाही. मग गजाननाने बालरूप धारण केले. 263 पायऱ्या चढल्यानंतर गजाननाचे दर्शन होते.

लेण्याद्री पर्वतावर वसलेले पुणे जिल्हयातील आणखी एक हे अष्टविनायकाचे स्थान. पुणे जिल्हयातील आणखी एक अष्टविनायकाचे स्थान म्हणजे ओझरचा विघ्नहर सातवा गणपती. विघ्नासूर नामक राक्षस सर्व ऋषींना त्रास देत असे यातून मुक्‍तता मिळवण्यासाठी पार्श्‍वऋषींनी गजाननाला प्रसन्न करून घेतले. गजाननाने पार्श्‍वपुत्र होवून त्या विघ्नासूरांचे निर्दालन करण्याचे वचन दिले. तीच ही जागा विघ्नासूराला पराभूत केले व शरण आलेल्या विघ्नासूराने “विघ्नहर’ नाव धारण करून आपला उध्दार करावा, अशी मागणी गणेशाला केली, गजाननाचे हे मान्य केले व त्या विघ्नासुराला आपल्या गणात सामील केले. गणेशाची पूर्णाकृती मूर्ती डोळयात “माणिक’ आहेत. कपाळावर व बेंबीत हिरा जडवला आहे हे याचे वैशिष्टय. गणेश जयंतीला हत्तीवरुन पेढे वाटण्याची प्रथा आहे.

“रांजणगांव’ हे पुणे-नगर मार्गावरील आणखी एक अष्टविनायकाचे स्थान आठवा गणपती रांजणगावचा महागणपती थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हयातीत गाभारा बांधला आहे. दोन्ही बाजूला रिध्दी, सिध्दी आहेत हे वैशिष्टय. आद्य षींच्या मनासपुत्राने गणेशाला प्रसन्न केले, कार्तिक शुध्द पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी शंकराने त्रिपुरासूराचा नाश केला, जग जिंकायला बाहेर पडलेला त्रिपुरासूर शंकराशिवाय कुणीच मारु शकत नाही, असे मानसपुत्राला गणेशाने वर देताना सांगितले होते. शंकराने गणपतीची उपासना केली. तेव्हा गजाननाने शंकराला बीजमंत्र दिला व शंकराने त्रिपुरासूराचा वध केला. ही घटना त्रिपुरारी पौर्णिमा, येथे ही घटना घडली ते रांजणगांव.

अष्टविनायकाच्या स्थानाची महती व माहिती सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. गजाननाची ही विविधरुपे, आपल्या जगण्याचा आधार आहेत, अधिष्ठान आहेत, कधी विघ्नहर्ता तर कधी चिंतामणी बहुविध नावांनी विनायकाची नामावली असली तरी शक्‍ती एकच तिथे नित्य स्मरण रहावे, आर्शिवाद आपल्यालाही मिळावेत म्हणून ही एक अष्टविनायक शब्दरुपी मानसयात्रा करण्याचा प्रयत्न तुमच्या, आपल्या सर्वांसाठी गणेशा चरणी रुजू होवू देत हीच त्या विघ्नेश्‍वर विघ्नहर्ताला प्रार्थना!!

– मधुरा धायगुडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)