अष्टविनायक गणपती रस्ते विकासाचे काम त्वरित सुरू करा

थेऊर येथे विश्वासराव देवकाते यांना लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

थेऊर- अष्टविनायकातील श्रीक्षेत्र थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, ओझर, लेण्याद्री, रांजणगाव या गणपतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होण्यासाठी, तसेच अष्टविनायक गणपतींचे दर्शन भाविकांना सुलभ व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या “अष्टविनायक गणपती रस्ते विकास प्रकल्पाच्या’ कामाचे भूमिपूजन होऊन आज (दि. 12) चार महिने पूर्ण होत आहेत, तरीही या रस्त्याच्या कामाला अजून सुरुवात झालेली नाही, त्यामुळे गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, तसेच या परिसरातील नागरिकांना खराब झालेल्या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
आज श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने, पै. युवराज हिरामण काकडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, दत्तात्रय कुंजीर, संजय गावडे, रमेश कांबळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांची भेट घेऊन, अष्टविनायकातील पाच गणपती पुणे जिल्ह्यात येत असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने देवकाते यांना या कामात लक्ष घालण्याची विनंती केली आणि या रस्त्यांच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी मागणी केली.
यावेळी देवकाते यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे यांच्याशी संपर्क साधून ‘अष्टविनायक गणपती रस्ते विकास प्रकल्पाचे’ काम त्वरित सुरू करण्याची सूचना केली, तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशीही संपर्क साधून प्रकल्पाचे काम सुरू करण्याची विनंती केली. पुढील आठवड्यात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बैठकीत हा विषय मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या कानावर घालणार असल्याचेही यावेळी देवकाते यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)