अश्‍विनी-सिक्‍की रेड्डी  जोडी उपान्त्यपूर्व फेरीत

श्रीकांत व प्रणय आव्हान संपुष्टात 
जकार्ता- अश्‍विनी पोनप्पा व सिक्‍की रेड्डी या जोडीने मेई कुआन चो आणि मेंग लीन यी या मलेशियन जोडीवर 21-17, 16-21, 21-19 असा विजय मिळवीत आशियाई क्रीडास्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र भारताचा पुरुष एकेरीतील स्टार बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत, तसेच एच. एस. प्रणयचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.

परंतु जागतिक क्रमवारीत 28व्या क्रमांकावर असणाऱ्या हॉंगकॉंगच्या वोन्ग विंग की व्हिन्सेंट याने श्रीकांतला पराभवाचा धक्‍का दिला. श्रीकांतने हा सामना 21-23 आणि 19-21 असा गमावला. पहिल्या सेटपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये गुण मिळवण्यासाठी चांगलीच लढत पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये एकवेळ श्रीकांत 11-9 असा आघाडीवर होता. परंतु त्यानंतर हॉंगकॉंगच्या खेळाडूने सामन्यात पुनरागमन करत पाहिला सेट 23-21 असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये देखील श्रीकांतच्या खेळातील उणीवा शोधत त्याने श्रीकांतवर 21-19 असा विजय मिळवला. श्रीकांतने गेल्या वर्षी चार स्पर्धांचे विजेतेपद पटकावले होते त्यामुळे भारताला त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र श्रीकांतचा दुसऱ्याच फेरीत पराभव झाल्याने पदकाच्या आशेवर पाणी पडले आहे.

दरम्यान प्रणयलाही पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत थायलंडच्या कान्टाफोन वांगचारोएनविरुद्ध 12-21, 21-15, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. प्रणयने दुसरी गेम जिंकून पुनरागमन केले होते. परंतु कान्टाफोनने तिसऱ्या गेममध्ये आपला खेळ उंचावताना बाजी मारली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)