अश्‍विनी भालेराव हिला यंदाचा शकुंतला निकम परिचारिका पारितोषिक

तळेगाव स्टेशन – तळेगाव दाभाडे येथील तळेगाव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे नर्सिंग कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी अश्‍विनी भालेराव हिला यंदाचा कै. शकुंतला निकम परिचारिका पारितोषिक 10 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक सन्मानीत करण्यात आले. महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या सचिव डॉ. सुमन टिळेकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे उपस्थित होते.

या वेळी संस्थेचे उपाघ्यक्ष डॉ. अशोक निकम, डॉ. दिलीप भोगे, शैलेश शाह, डॉ. कडलासकर, डॉ. शाळीग्राम भंडारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मोरे, नगरसेवक गणेश खांडगे आदी उपस्थित होते. डॉ. मोरे, म्हणाले की परदेशात डॉक्‍टर पेक्षा नर्सेसना जास्त पगार दिला जातो. कोणत्याही हॉस्पिटलची प्रतिष्ठा ही तेथील नर्सिंग केअरवर ठरते. शैलेष शाह आणि डॉ. भंडारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मोनालिसा पारगे, उपप्राचार्या कल्याणी गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता निसवडे यांनी संयोजन केले. मिलिंद निकम व सुवर्णा जाधव यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)