अश्‍विनीच्या लग्नासाठी श्रीगोंदेकरांचा मदतीचा हात 

आगीत घर भस्मसात : दानशूनरांनी उचलल्या लग्नातील विविध जबाबदाऱ्या
श्रीगोंदे – लग्नघटीका काही दिवसांवर आली असताना छप्पराला लागलेल्या आगीत आईवडीलांनी कष्ट करून जमवलेली पुंजी जळून गेली. अशा बेघर झालेल्या पोपट हुंडेकरी या शेतमजुराची कन्या अश्‍विनी हीच्या विवाहला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत.
शहरापासून काही अंतरावरील लोखंडेवाडी परिसरात राहणारे पोपट हुंडेकरी यांना मनिषा, बेबी, पल्लवी, वनिता, अश्‍विसनी या पाच मुली आहेत. चार मुलींचे लग्न मोलमजुरी करून केले. अश्‍विनीचे लग्न दि. 9 मे रोजी करमाळा तालुक्‍यातील कुंभारगाव येथील देवीदास गलांडे यांचा मुलगा सागर याच्याशी निश्‍चित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत चार दिवसापूर्वी छपराला लागलेल्या आगीमुळे हुंडेकरी परिवारासमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे.
हुंडेकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक हात पुढे येऊ लागले. यामध्ये नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी लग्नातील किराणा व 50 हजार रुपये तर आमदार राहुल जगताप यांनी 21 हजार रुपये मदत केली. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस व सामाजिक कार्यकर्ते शांताराम पोटे यांनी प्रत्येकी पाच हजार दिले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश बोरा यांनी मंगळसूत्र व लग्नासाठी रत्नकमल मंगल कार्याला मोफत उपलब्ध करून दिले. सनराईज पब्लिक स्कुलचे सतीश शिंदे यांनी वऱ्हाडी मंडळींसाठी मोफत स्कुल बस उपलब्ध करून दिल्या आहेत. अग्नीपंख फाउंडेशनने या कुंटूबाला एक क्विंटल धान्य दिले आणि अश्विनीसाठी पाच हजाराचा संसारोपयोगी भांडी सेट दिला. श्रीगोंदा येथील साईनाथ गॅस एजन्सीचे जयसिंग जवक यांनी मोफत गॅस कनेक्‍शन दिले आहे. सतीश पोखर्णा हे कपडे खरेदीसाठी मदतीचा हात देणार आहेत.
माणुसकीच्या भावनेतून श्रीगोंदेकरांनी केलेल्या या मदतीबद्दल हुंडेकरी कुटूंबास गहिवरून आले. ऋण व्यक्त करण्यासाठी आपणाकडे शब्द नाही ही भावना त्यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)