अश्विन विरुद्ध चांगले खेळण्यासाठी नेल्सनचा सल्ला घेईन – ट्रेवीस हेड

ऍडिलेड: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रेवीस हेड हा अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या हॅरी नेल्सनशी चर्चा करणार आहे असे त्याने सांगितले. नेल्सन आणि हेड हे दोघेही स्थानिक क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी खेळतात.

भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघात झालेल्या एकमेव सराव सामन्यात डावखुऱ्या नेल्सन ने 100 धावा बनविल्या होत्या. त्याबाबत बोलताना हेड म्हणाला, या सामन्यात त्याने चांगला खेळ केला होता. त्यामुळे मी फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी त्याचा सल्ला घेईन. आमच्या संघात सहा उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज आहेत ते रवींद्र जडेजासाठी प्रश्न उपस्थित करू शकतात. मी डावखुरा फलंदाज असल्याने मला अश्विनचा सामना करताना जबाबदारीने खेळ करावा लागेल. मी आयपीएलमध्ये काही वेळा त्याचा सामना केला आहे. परंतु, कसोटी सामन्यात त्याची गोलंदाजी खेळण्याची संधी आली नव्हती. त्यामुळे त्याच्या विरुद्ध खेळण्याचा जास्त अनुभव नाही.

-Ads-

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऍडलेड येथे 6 डिसेंबरला होणार आहे. हे मैदान फलंदाजीस मदत करणारे मैदान आहे. त्याचबरोबर विराटसाठी लकी मैदान आहे. विराटने येथे 3 शतके झळकाविली आहेत.

भारतीय कर्णधार विराट कोहली विषयी बोलताना हेडने सांगितले की, आमच्याकडे कसोटीसाठी सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहेत. त्यामुळे ते विराटसाठी डोकेदुखी ठरू शकतात. मागील दौऱ्यात विराटने खूप धावा केल्या होत्या त्यामुळे यावेळी त्याला रोखणे हे आमचे पहिले लक्ष्य असेल. आमच्या तीन जलदगती गोलंदाजांचा सामना करणे त्याला निश्‍चितच अवघड जाईल. त्याचबरोबर नॅथन लायन याने मागील दौऱ्यात याच मैदानावर 12 बळी मिळवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे विराट विरुद्ध आमची गोलंदाजी सरस ठरवी अशी आशा आहे.

मैदानावरील आणि मैदानाबाहेरील काही विषयांवर बोलताना त्याने सांगितले की, आम्ही मैदानावर आक्रमक खेळ करण्याचा प्रयन्त करणार आहोत. या मालिकेत बाचाबाची होऊ नये यासाठी आम्ही प्रयन्त करू. आमच्या खेळात आक्रमकपणा दाखवण्याकडे आमचा कल असेल. आम्ही गोलंदाजी करत असताना देखील आक्रमक क्षेत्ररक्षण करून धावा वाचवण्यावर आमचा भर आहे, असेही तो यावेळी म्हणाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)