अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे पदोन्नतीच्या यादीत नाव

कोल्हापूर :  महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी निलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचे चक्क पदोन्नतीच्या यादीत नाव आले आहे. हत्या प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या आरोपी अभय कुरुंदकरचे पदोन्नतीच्या यादीत नाव आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

शासनाकडून 28 जूनला काढण्यात आलेल्या परिपत्रकात अभय कुरुंदकरचे नाव पोलीस उप-अधीक्षकाच्या निवड सुचीत 228 व्या क्रमांकावर तर 1 जानेवारी 2016 च्या यादीत सेवा ज्येष्ठतेसाठी 856 व्या क्रमांकाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपी अभय कुरुंदकरला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या नातेवाईकांनी वारंवार केला होता. आता जेलमध्ये असणाऱ्या या आरोपीचे पदोन्नतीच्या यादीत नाव आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हेतूवर संशय घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)