अश्विनी बिंद्रे हत्याकांड : राजेश पाटीलचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण
मुंबई – अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याला उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला. गेले काही महिन्यांपासून जामीनासाठी अर्ज करून जामीनाच्या प्रतिक्षेत असलेल्या राजेश पाटील याचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी राजेश पाटीलला डिसेंबर 2017मध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्याने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला. गेली सुमारे दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सरकारी वकील ऍड. ज्योती लोहोकरे यांनी या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. 11 एप्रिल 2016 रोजी घटना घडली. त्या रात्री राजेश पाटील हा एका टॅक्‍सीतून भाईंदर येथे गेला आणि पुन्हा रात्री आमदार निवास येथे परत आला. दरम्यानच्या काळात तो प्रमुख आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरूंदकर याच्या फोनवर संपर्कात होता. तसो टॅक्‍सी डाव्हरचा जबाब आणि मोबाईल डाटा ऍड. ज्योती लोहोकर यांनी सादर केला. आरोपीला जामीन मिळल्यास पुरावे नष्ट करण्याची, तसेच साक्षीदार फोडण्याची शक्‍यता व्यक्त केली. सरकार वकीलांनी सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने राजेश पाटीलचा अर्ज फेटाळून लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)