अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

पिंपरी – विवाहित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करून तिची अश्लील चित्रफीत तयार केली. झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी थेरगाव, डांगे चौकातील एका हॉटेलमध्ये घडली.

किरण कृष्णा भालेकर (वय 42, सोमनाथनगर, रा. वडगाव शेरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेले लग्न झाले आहे. ती एका आयटी कंपनीत काम करत आहे. तिच्या पतीच्या माध्यमातून आरोपी किरण याची तिच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेच्या नवऱ्याला चांगले काम मिळवून देतो असे आमिष दाखवून महिलेला डांगे चौकातील एका हॉटेलवर बोलावून घेतले. तिथे त्याने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’असे म्हणत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच आरोपीने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्यास मूल होणार असल्याचे सांगत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला.

या प्रकारची आरोपीने चित्रफीत तयार केली. घडलेल्या प्रकाराबाबत जर महिलेने कोणास काही सांगितले तर आरोपीने चित्रफीत सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केले. पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली.
फौजदार अमित शेटे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)