अशोक बॅंकेतर्फे 10 टक्‍के लाभांश जाहीर

पिंपरी – अशोक नागरी सहकारी बॅंकेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये सभासदांना 10 टक्‍के लाभांश जाहीर करण्यात आला.

संत तुकारामनगर येथील विरंगुळा केंद्रात खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली. सभेच्या सुरुवातीला बॅंकेचे दिवंगत माजी संचालक शहाजी बंडु लादे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बॅंकेचे अध्यक्ष ऍड. राजरत्न शिलवंत, आचार्य रतनलाल सोनग्रा, डॉ. प्रशांत पगारे, अरूणकुमार सकट, राजाभाऊ गोलांडे, ऍड. गोरक्ष लोखंडे, मायला खत्री, महेंद्र जावळे, सुरेश शिशुपाल, सुरेश कोळगे, सुनील कांबळे, आर. जी. गायकवाड, एम. बी. चेनिगुंड, दिलीपराव गायकवाड, सोना प्रधान, रमेश चिमुरकर, जयवंतराव भोसले, यशवंत भालेराव, डॉ जनार्दन मुनेश्‍वर, डॉ. मिलिंदराजे भोसले, विजय गायकवाड, विशाल कांबळे, बॅंकेचे संचालक विकास शिलवंत, भीमराव माने, ऍड निलेश नगराळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शिलवंत यांनी सभासदांनी बॅंकेवर जो विश्‍वास दाखविला आहे. त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे सांगितले. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, डॉ. प्रशांत पगारे, प्राचार्य रतनलाल सोनग्रा, महेंद्र जावळे, आर. जी. गायकवाड, रमेश चिमुरकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. राजेंद्र भोसले, सुभाष गेडाम, संजय जैस्वाल, रामकिसन राठोड आदी ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला. दिक्षा भोसले हिची जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. बॅंकेचे अध्यक्ष ऍड. राजरत्न शिलवंत यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)