अशोका आर्ट गॅलरी मार्फत मधुबनी चित्र कार्यशाळेचे आयोजन

नगर – भारताची लोक चित्रकला मधुबनी चित्रकला सोपे परंतु आकर्षक नैसर्गिक आकार, भडक परंतु लक्षवेधी रंग आणि ओघवल्या रेषांनी युक्त चित्रशैली म्हणजे मधुबनी चित्र शैली. निसर्गाच्या विविध आकाराना कलात्मकतेचा साज चढवून सोप्या-सोप्या परंतु सुंदर रचना पासूनहि चित्रे तयार होतात. कोणतेही चित्रकलेचे परिणाम, प्रमाणबद्धतेत न अडकता स्वैर रेषा, मनपसंत रंग आणि साधे-सोपे विषय घेवुन तयार होणारी चित्रे सर्वांना मनापासून आवडतात. मासे, पक्षी, प्राणी, झाडे वेली, फळे, आनंदी चेहऱ्यांच्या व्यक्ती मुळे हि चित्रे अधिक लोक प्रिय झाली आहेत. महाराष्ट्राच्या वारली चित्र कलेप्रमाणेच संपुर्ण विश्‍वात या मधुबनी चित्र शैलीचे देखिल मोठे आकर्षन आहे. आपल्या गृह सजावटीत या चित्र शैलीतील चित्रांना इंटेरिअर डिझायनर आज प्रथम पसंती देतांना दिसतात.
या आकर्षक परंतु तितक्‍याच सोप्या चित्र शैलीतील चित्र निर्मिती कार्यशाळा अशोका आर्ट गॅलरीत येत्या एक मे पासून सर्व कला रसिक नगरकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. पाच दिवसाच्या या कार्यशाळेत या चित्रांच्या बेसिक आकरांची, रंग संगतींची तयारी करुन घेण्यात येणार असून प्रत्येक सहभागी कलारसिकांकडून किमान तीन चित्र या शैलीत करुन घेण्यात येणार आहे. या साठी लागणारे सर्व साहित्य रंग, ब्रेश, पेपर आदी आयोजकांमार्फत देण्यात येणार आहे. चित्र कलेची आवड असणाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन कलाश्री आर्ट अकादमीच्या संचालिका हर्षदा डोळसे यांनी केले आहे.
कार्यशाळेत मोजकेच कला रसिक सहभागी होऊ शकतील. त्यामुळे प्रथम नोंदणी करावी. रोज दोन तास चालणार्या या कार्यशाळेत तयार होणार्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. चित्रसाक्षरतेसाठी वर्षभर विविध कलाउपक्रम गॅलरी मार्फत राबविण्यात येत असून विविध लोककलांची माहिती व्हावी. प्रत्येकाच्या घरी एक तरी स्वत: रंगविलेले किंवा चित्रकरांचे चित्र असावे या उद्देशाने हा कलाउपक्रम राबविण्यात येत आहे. सहभागासाठी कोणत्याही वयाची अट नसून केवळ आवड आणि नवीन निर्मितीची इच्छा असावी. कार्यशाळेत सहभागासाठी 9960061422 किंवा 8237370003 या नंबरवर नोंदणी करावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)