मातृदिन म्हणजेच आईच्या वात्सल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आज अनेकांनी आपल्या आईसाठी भेटवस्तू घेतल्या असतील. त्यांच्यासाठी खास प्लॅनिंगही केलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? मातृदिन साजरा करण्याची पद्धत कशी सुरू झाली.

अॅन मारिया रिवस जार्विस यांची मुलगी अॅना जार्विस हिने अमेरिकेचे २८वे राष्ट्राध्यक्ष थॉमस वुड्रो विल्सन यांच्यासमोर मातृदिनाचा प्रस्ताव मांडला होता. अॅन मारिया या समाजसेविका होत्या. त्यांनी अमेरिकन यादवी युद्धांच्या काळात अनेक स्त्रियांसाठी कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाद्वारे त्या स्त्रियांना लहान मुलांचं कुपोषण, अस्वच्छता, त्याच्याशी संबंधित समस्या आणि त्यावरचे उपाय या विषयांवर मार्गदर्शन करत असे. अॅन मारिया अशिक्षित मुलांना शिकवण्यासठी रविवारी विशेष वर्गही आयोजित करत असे. त्यांनीच आपल्या मुलीला अॅनाला या सेवाव्रताचा वारसा दिला.

१९०५ मध्ये आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या कार्याच्या स्मरणाप्रित्यर्थ मे महिन्यातला दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा व्हावा अशी मागणी अॅनाने अमेरिकन सरकारकडे केली. त्यानुसार तिने प्रस्तावही दाखल केला. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं आणि ९ मे १९१४ मध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून दर मे महिन्यातला दुसरा रविवार जागतिक मातृदिन म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)