आपला अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा सलामीवीर ऍलिस्टर कूकला चाहत्यांसह भारतीय संघानेही मानवंदना दिली. 33 वर्षीय कूकने 12 वर्षांपूर्वी भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता त्याची निवृत्तीही भारताविरुद्धच्या सामन्यातून होत आहे.

कूक मैदानात उतरला तेव्हा दोन्ही बाजूंना रांगेत उभे राहून भारतीय खेळाडूंनी कूकला मानवंदना दिली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने कूकशी हस्तांदोलन केले आणि अखेरच्या सामन्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. कूकने आपल्या कसोटी कारकिर्दीत 161 कसोटी सामन्यांमध्ये 44.88 च्या सरासरीने 12,254 धावा केल्या असून त्यात 32 शतके आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)