‘अशी’ झाली ‘बबन’च्या कोमलची अभिनेत्री म्हणून निवड

भाऊराव कऱ्हाडे यांची निर्मिती असलेल्या ‘बबन’ चित्रपट चित्रपटगृहात हाऊसफुल्ल झाला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव म्हणजेच कोमल ही नवीन जोडी पाहायला मिळाली. ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचे दिसतेय. यामुळे जाणून घेऊया, एक अभिनेत्री म्हणून गायत्री जाधवची निवड कशी झाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री ही मूळ पुण्याची आहे. ती एकेदिवशी रस्त्याने तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती तेव्हा भाऊराव यांनी तिला पाहिले. तेव्हा त्यांनी तिच्या चालण्या-बोलण्याचे निरीक्षण केले. त्यानंतर भाऊराव यांनी त्यांच्या टीममधील एकाला तिच्याकडे पाठवले. मात्र चित्रपटासाठी अशी ऑफर कशी काय येऊ शकते, असे गायत्रीसह तिच्या घरच्यांनाही वाटले. यानंतर तिच्या वडिलांनी भाऊराव यांच्याबद्दल नेटवर रिसर्च केला आणि गायत्रीला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)