अशी घ्या ‘त्वचेची’ काळजी

थंडीच्या दिवसांत त्वचेतील आद्‍र्रता कमी होते. त्याची ताबडतोब काळजी घेतली नाही तर तिच्यावर सुरुकुत्या पडणे, भेगा पडणे असे विकार व्हायला लागतात. म्हणून वेळीच काळजी घेणं आवश्‍यक आहे. थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ करावी. चेहरा किंवा हात धुण्यासाठीही गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करावा. गरम पाण्यामुळे त्वचेतील तेल उडून जात नाही. चेहरा धुऊन झाल्यावर त्यावर ताबडतोब मॉइश्‍चर क्रीम लावावं. म्हणजे त्वचा निस्तेज दिसत नाही. त्यामुळे बाथरूममध्ये किंवा वॉशबेसिनवर तुम्ही लावत असलेलं क्रीम आवर्जून ठेवा.
मॉइश्‍चरची निवड योग्य करा. ऑईल बेस्ड अर्थात तेलाचं प्रमाण असलेल्यां क्रीमची निवड करा. काही क्रीम्समध्ये पाण्याचा वापर अधिक केलेला आढळतो. काही क्रीम्समध्ये पेट्रोलियमचा समावेश अधिक असतो. त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होते. बोचऱ्या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी हातमोजे किंवा पायमोजांचा वापर करा. कारण उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातला सूर्यही धोकादायकच असतो. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उघडया पडलेल्या भागावर क्रीम लावायला विसरू नका.
थंडीच्या दिवसांत मुळातच आपण पाणी कमी पितो आणि कोकाकोला किंवा चहा, कॉफी अशी पेये पिण्याकडे कल वाढतो. पण ही पेय पिण्यापेक्षा गरम पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास शरीरारील आद्‍र्रता टिकून राहते. इतर भागांवरील त्वचेच्या तुलनेत हात, पाय, कोपरं, ढोपरं, घोटे यांच्यावरील त्वचा पटकन कोरडी होते. त्यामुळे रात्री झोपताना या भागांना क्रीम लावून झोपावं. म्हणजे त्या भागांना मॉईश्‍चर मिळण्यास मदत होईल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)