अशी गेली राम राहिमची कारागृहात पहिली रात्र

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सोमवारी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर राम रहीमची तुरुंगात रवानगी करण्यात आली दरम्यान, राम राहिमची   तुरुंगातील पहिली रात्री बॅरेकमध्ये चकरा मारण्यातच गेली.
तो रात्रभर झोपू शकला नाही. गुरमीतला जेवणात ४ चपात्या आणि भाजी देण्यात आली होती. मात्र, त्याने फक्त अर्धी चपाती खाल्ली. यासोबतच राम रहीमला तुरुंगात नवीन नंबर देण्यात आला आहे.  राम रहीम तुरंगात आता ८६४७ हा नंबर देण्यात आला आहे. करोडोची संपत्ती जमवणा-या या बलात्कारी बाबाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणे मजूरीही करावी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याची टेस्ट अजून झाली नाही. जर तो टेस्टमध्ये फिट असला तर त्याला मजूरी करावी लागले. नाही तर त्याला खुर्ची तयार करण्याचे काम दिले जाईल. बिस्कीट बनवण्याचे कामही त्याला दिले जाऊ शकते. यात त्याला सकाळी ८ पासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करावे लागेल.
राम रहीमला दोन वेगवेगळ्या प्रकरणात १०-१० वर्षांची शिक्षा झाली आहे. म्हणजे त्याला २० वर्ष तुरुंगात काढावी लागणार आहेत. तर ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)