… अशी असेल भारतात येणारी बुलेट ट्रेन

अहमदाबाद: अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनविषयी भारतीयांमध्ये मोठी उत्सुकता आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविले असून, उद्या १४ सप्टेंबर रोजी या प्रकल्पाचे भूमीपूजन होणार आहे. त्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे भारतात दाखलही झाले आहेत. गुजरातमधील साबरमती या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम  उद्या पार पडणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी  जपानच्या ‘जायका’कडून अर्थसहाय्य मिळणार असून, हा प्रकल्प २०२२ मध्ये सुरू होईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी स्पष्ट केले होते. सध्या जपान, ऑस्ट्रिया, बेल्जियम, चीन, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरीया, स्वीडन, तैवान, तुर्की, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये बुलेट ट्रेन आहेत. आगामी पाच वर्षात भारताचेही नाव या यादीत समाविष्ट होणार आहे.
जपानच्या बुलेट ट्रेन जास्त सुरक्षित मानण्यात येतात. त्यामुळे अहमदाबाद-मुंबई या प्रकल्पासाठी जपानचे सहाय्य घेण्यात आले आहे.मुंबई ते अहमदाबाद या एकूण ५०८ किलोमीटरच्या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. या पूर्ण मार्गावर एकूण १२ स्थानके असून ही ट्रेन सर्व स्थानकांवर थांबणार आहे. या बुलेट ट्रेनचा वेग ३२० ते ३५० किलोमीटर प्रतितास इतका असेल. यामध्ये २१ किलोमीटरचा सर्वात मोठा बोगदा असेल. विशेष म्हणजे त्यातील ७ किलोमीटरचा बोगदा हा समुद्राखालून जाणार आहे.
भारतात पहिल्यायांदाच अशाप्रकारे समुद्राखालून प्रवास कऱण्याचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. संपूर्ण प्रवासासाठी २ तास ५८ मिनिटांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे ४००० थेट रोजगार निर्माण होतील आणि किमान २० हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)