अशा गवळी ऊर्फ मम्मीला दोन गुन्ह्यात तात्पुरता अटकपूर्व

मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत दोन्हीही खंडणीचे गुन्हे

पुणे- कुख्यात गुंड अरूण गवळी यांची पत्नी मम्मी ऊर्फ अशा गवळी यांना मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दोन खंडणीच्या गुन्ह्यात खेड न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजेरी लावायची, तपासाला सहकार्य करायचे, तपासामध्ये ढवळाढवळ करायची नाही, फिर्यादीवर दबाब टाकायचा नाही, सध्याचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना देणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र न सोडणे, जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, या अटीवर दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी 30 हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजुर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.ब्रम्हे यांनी हा आदेश दिला आहे.
याबाबत चंदननगर येथील एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात मम्मी, सुरज यादव (लोणी धामणी, ता. आंबेगाव), मोमीन मुजावर (रा. मुंबई) आणि बाळा पठारे (रा. वाघोली) आणि अन्य एका व्यक्तीवर प्रकरणात गुन्हा दाखल आहे. यादव, मुजावर आणि पठारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 13 ते 16 एप्रिल या कालावधीत घडली. फिर्यादी यांचे चंदननगर येथे ड्रायफ्रुटचे दुकान आहे. याबरोबरच लोणी धामणी येथे एक दुकान आहे. तेथे त्यांच्या भावाचे कपड्याचे दुकान आहे. ही तीन्ही दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणीची फिर्यादींच्या मोबाईलवर फोन करून मागणी करण्यात आली होती.
खंडणी न दिल्यास दुकानाची मोडतोड करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात मम्मी यांनी ऍड. पी.बी. बिराजदार, ऍड. नितीन शिंदे, ऍड. सुरेश जाधव आणि ऍड. डी.एल.वाठोरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सरपंच सावळा नाईक यांच्याकडून दीड लाख रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी मंचर पोलिसात मम्मीसह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर मम्मीला अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)