अवैध व्यवसायिकांवर कठोर कारवाई करा

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : म्हसवड यात्रा नियोजन बैठक

म्हसवड  – म्हसवड येथील रथोत्सव दि. 8 डिसेंबर रोजी होत असून सुमारे पाच लाख भाविक येणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने म्हसवड परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल यांनी दिले.

म्हसवड येथे गुरुवारी यात्रा नियोजन समितीची बैठक मंदिर सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी, डीवायएसपी अनिल वडणेरे, गटविकास अधिकारी, माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता गायकवाड, डॉ. व्ही. के. फाळके, सौ. गायकवाड, वीजमंडळ एस. एम. शेट्टी, एस. टी. विभाग वाहतूक नियंत्रक मनिषा खाडे, मुख्याधिकारी पंडीत पाटील, नगरसेवक धनाजी माने, बाळासाहेब मासाळ, युवराज सुर्यवंशी, दतात्रय गुरव, (होंकारे), नगरसेवक पृथ्वीराज राजेमाने, सालकरी किर्तने, उपअभियंता शेळके, नगरसेवक विकास गोंजारी, शहाजी लोखंडे, कारंडे, सिध्दनाथ सालकरी सिध्दनाथ गुरव, प्रा. विश्‍वभंर बाबर, पीएस आय गोसावी, जि.प. अभियंता, सार्वजनीक बांधकाम अभियंता आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सिंघल यांनी बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलिस विभाग, अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यांची दक्षता घेण्यासाठी प्रशासनाने दक्ष रहावे, रस्त्यांची दुरुस्तीची कामे यात्रेपुर्वी करावीत. रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे करावेत, आवश्‍यक तेथे फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी यावेळी विविध मुद्यांवर नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. पाणी तपासणी करणे, रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, साईड पट्टयावर मुरुम भरणे, पाण्यात जंतुनाशक वापर करणे, साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी काळजी घेणे, यात्रेत दुकाने परवाने देताना व वीज पूरवठा करताना दक्ष रहावे, स्वतंत्र वीज व्यवस्था करणे, यात्रा नियंत्रण कक्ष स्थापन करून सोय करणे, पर्यायी रस्ता निर्माण करणे, याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील सर्व रस्ते एकेरी वाहतूक करण्याच्या सुचना देण्यात आल्या. आरोग्य विभाग, एसटी विभाग, नगरपालिका, वीज वितरण, पोलिस प्रशासन आदीं विभागांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)