अवैध वाहतूक; 106 रिक्षांवर कारवाई

रिक्षा चालकांचे धाबे दणाणले : हडपसर ते गाडीतळ कारवाई

हडपसर – हडपसर पोलीस ठाण्याच्या वतीने नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 106 रिक्षांवर कारवाई करून जप्त केल्या. सोमवारी सायंकाळी साडेचार ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जप्त करण्यात आलेल्या रिक्षांमध्ये स्क्रॅप झालेल्या रिक्षा, गणवेश परिधान न करणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, रिक्षा थांबा नसताना रिक्षा थांबविणे, चालकाकडे बॅच व लायसन्स नसणे, अल्पवयीन रिक्षाचालक, अवैध थांब्यावर रिक्षा थांबवणे, रिक्षाला परमिट नसणे, रस्त्यावर बेशिस्तीने रिक्षा थांबवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, अशा रिक्षांचा समावेश आहे. ही कारवाई हडपसर ते गाडीतळ या दरम्यान करण्यात आली. यापुढे हडपसर परिसरातील सर्व भागातील रस्त्यावर धावणाऱ्या अवैधरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालक तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना चपराक बसली आहे. यासाठी वाहतूक अशाप्रकारे आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)