अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

रहिमतपूर- रहिमतपुर ते ब्रम्हपुरी मार्गावर गुरवारी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी डंपरवर, वाळूसह सुमारे 20 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या या धडक कार्यवाहीमुळे अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोरेगाव उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. कुंभार, पो. ना. पी. एम. भोये, एस. सी. जाधव यांच्या पथकाने गुरूवार दुपारी ब्रम्हपुरीकडून रहिमतपुरकडे येत असलेल्या डंपर (एमएच 11 बीएल 777) आणि डंपर (एमएच11 बीके 922) यांच्यावर कारवाई करत एकूण 20 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

चालकांजवळ असलेली पावती बनावट असल्याचे आढळून आल्याने डंपर चालक गणेश अनिल जांभळे, मालक विक्रम पोपट जाधव रा. कोडोली (वय 26) रा. शाहूपुरी सातारा व संकेत सुभाष माने (वय 22) रा. मोरगल्ली रहिमतपूर, मालक शंकर बाळासाहेब बर्गे रा. कोरेगाव, लीलावधारक सुंदर कल्याण घाडगे रा. कामेरी ता.जि.सातारा यांच्यावर कारवाई करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)