अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

म्हासुर्णे, दि. 1 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील चोराडे येथील फाट्याजवळ अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली.
औंध पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमासास मायणीकडून येत असलेल्या पिवळ्या रंगाच्या डंपरमधून तीन ब्रास इतकी वाळू असल्याचे निदर्शनास आली. या डंपर चालक भरत संभाजी गोडसे (वय 33) रा. वडुज तर डंपर मालक किरण गोट्या जाधव रा. वडुज यांचे डंपर (एमएच 11- वाय 7272) हा वाहन चालविण्याचा परवाना तसेच नमुद डंपरची कागदपत्रे न बाळगता बेकायदा वाळू उत्खनन करुन डंपरमध्ये 3 ब्रास गौण खनिज वाळू किंमत 21 हजार तसेच डंपरचीअसा एकुण 10 लाख 21 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)