अवैध वाळू उपशावर छापा

प्रेरणा कट्टे यांची कारवाई : 12 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुसेगाव – खटाव तालुक्‍यातील शिरसवस्ती परिसरात लोणहिरा ओढापात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर बुधवारी डिवायएसपी प्रेरणा कट्टे आणि सपोनि विश्‍वजीत घाडगे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एक जेसीबी, एक ट्रॅक्‍टर आणि ट्रॉली असा 12 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खटाव येथील लोणहिरा ओढापात्रात अवैध वाळूउपसा सुरु असल्याची माहिती डिवायएसपी प्रेरणा कट्टे यांना मिळाली होती. बुधवारी दुपारी तीन वाजता कोरेगावचे सपोनि जगदाळे, राठोड, पुसेगावचे उपनिरिक्षक इंगळे, पो. ना. पिंगळे, पवार, कापरे यांच्या पथकाने या उपशावर छापा टाकला. लोणहिरा ओढापात्रात संदीप जाधव (वडूज), हेमंत राजेंद्र गोडसे (वडूज), योगेश नामदास अवैधरित्या वाळूउपसा करत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी घटनास्थळावरुन एक जेसीबी, एक ट्रॅक्‍टर आणि एक ट्रॉली (विना नंबर प्लेट) असा एकूण 12 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. वहानांचे मालक सुधीर पवार (दहिवडी) यांच्यावरही संगनमताने अवैध वाळूउपसा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. डिवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी पंधरा दिवसात खटाव परिसरात सलग दोन छापे मारुन, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाळूमाफीयांचे कंबरडे मोडले. सलग दोन कारवाया झाल्याने वाळूमाफीयांचे धाबे दणाणले
आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)