पाटण – लुगडेवाडी, ता. पाटण कराड-चिपळूण रस्त्यासाठी याठिकाणी अवैधरित्या उत्खनन करताना एल ऍण्ड टी कंपनीच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कामावर असणारी सर्व वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तलाठी जयेश शिरोडे यांनी दिली.
कराड-चिपळूण रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. एल ऍण्ड टी कंपनी ठेकेदार असणाऱ्या कंपनीने पोट ठेकेदारांना रस्त्याच्या कामाचा ठेका दिला आहे. मात्र ज्या ठिकाणी माती मुरुमाचे उत्खनन करण्यात येत आहे. त्याठिकाणी रॉयल्टी भरली नाही, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. लुगडेवाडी, ता. पाटण येथील शेती गट नंबर 356 याठिकाणी अनधिकृत एल ऍण्ड टी कंपनीने केले आहे. याठिकाणी कंपनीने कोणतेही रॉयल्टी भरली नसल्याचे सांगण्यात आले. यावरुन आज एल ऍण्ड टी कंपनीकडे काम करणाऱ्या पोकलेनवर कारवाई करण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा